Kon Honaar Crorepati | Sachin Khedekar | सचिन खेडेकर यांच्याशी दिलखुलास गप्पा | INTERVIEW |

2022-06-01 2

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते. संपूर्ण महाराष्ट्रातून 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो. 'आता आलीये आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ', असं या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खेडेकर करणार आहेत.